फडणवीस सरकारचा ‘हा’ निर्णय धनंजय मुंडेंकडून रद्द ; अनुसूचीत जातीच्या विद्यार्थांचा होणार फायदा

मुंबई (वृत्तसंस्था) ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. अनुसूचित जातीतील परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाजप सरकारच्या काळात घातलेला हा निर्णय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आता रद्द केला आहे.

 

ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल, असा भाजपा सरकारच्या काळात घातलेला हा अडसर धनंजय मुंडेंनी आता दूर केला आहे. आता परदेशी विद्यापीठात विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला, त्या विद्यार्थ्यांने आधी घेतलेले पदवी शिक्षण इतर शाखेचे असले तरी त्याला आता परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त त्याच बरोबर या योजनेतील वयोमर्यादा बाबतचा गोंधळ ही संपवला आहे. मुळात भारतात सुद्धा ‘विद्यापीठ अनुदान आयोगाच्या’ नियमानुसार अनेक अभ्यासक्रमांना अंतरशाखीय प्रवेश दिला जातो. कला, वाणिज्य, विज्ञान आदी शाखेत पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दुसऱ्या विशिष्ट शाखेत प्रवेश दिला जातो.

Protected Content