नवी दिल्ली वृत्तसंस्था । देवेंद्र फडणवीस हे केंद्रात गेल्यास उत्तमच असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.
सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीत मंत्रीमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष करून महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर याबाबच चर्चेला रंग चढला आहे. या पार्श्वभूमिवर, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना एबीपी माझा या वृत्तवाहिनीने प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी फडणवीस केंद्रात गेल्यास उत्तम असल्याचे सांगितले. त्यांच्या दिल्लीत जाण्याने राज्याला लाभ होणार असल्याचेही खडसे म्हणाले. अर्थात, हा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या मनावर अवलंबून असल्याचेही ते म्हणाले.
फडणवीस आणि खडसे यांच्यातील संघर्ष हा अनेकदा स्पष्टपणे दिसून आला आहे. कालच फडणवीस मुख्यमंत्री असतांना विरोधी पक्षाच्या नेत्यांसह एकनाथराव खडसे यांचा फोनदेखील टॅप करण्यात आला होता असा गौप्यस्फोट एका वर्तमानपत्राने केल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमिवर, एकनाथराव खडसे यांची ही प्रतिक्रिया अतिशय सूचक मानली जात आहे.