मुंबई प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस अजूनही भ्रमित अवस्थेमध्येच असून त्यांनी केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यांना जर शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांनी सेनेला मुख्यमंत्रीपद का दिले नाही? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी विचारत त्यांच्यावर टीका केली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजू परूळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यात भाजपला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, यावर अनेक चर्चा झाल्या, मात्र शरद पवारांनी नंतर भूमिका बदलली असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. आता या दाव्याला राष्ट्रवातीच्या विद्या चव्हाण यांनी प्रतिप्रश्न केला आहे. याबाबत त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस अजूनही भ्रमित अवस्थेमध्येच आहेत. त्यांनी केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यांना जर शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांनी सेनेला मुख्यमंत्रीपद का दिले नाही? राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार उत्तमरित्या काम करत आहे. हे फडणवीसांनी स्वीकारायला हवं असा टोला त्यांनी मारला आहे.