Home राजकीय फक्त गाढवाचीच छाती ५६ इंचाची असते : काँग्रेस नेत्याची जीभ घसरली

फक्त गाढवाचीच छाती ५६ इंचाची असते : काँग्रेस नेत्याची जीभ घसरली


499 17 1492838422

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष एकमेकांविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. त्यातूनच नेत्यांची वादग्रस्त विधाने समोर येत आहे. गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना आपत्तीजनक विधान केले आहे. मंगळवारी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना केवळ गाढवाची छाती ५६ इंचाची असते असं वादग्रस्त विधान केले.

 

मोढवाडिया यांनी आपल्या भाषणात बोलताना एका सामान्य व्यक्तीची छाती ३६ इंच असते, बॉडी बिल्डर व्यक्तीची छाती ४२ इंच असू शकते. फक्त गाढवाची छाती ५६ इंच असते तर बैलाची छाती १०० इंच असते. त्याचसोबत मोदीभक्त ही गोष्ट समजू शकत नाहीत, जेव्हा कोणी त्यांच्या नेत्याला ५६ इंच छातीचा नेता म्हणतं तेव्हा ते आनंदी होतात, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.

मोढवाडिया यांच्या विधानावर भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे. पराभवाच्या भितीने काँग्रेसच्या नेत्यांचे मानसिक संतूलन बिघडत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून अशाप्रकारे शब्दप्रयोग केले जात आहे. काँग्रेस नेत्यांच्या अशा वक्तव्याचा आणि पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या भाषेचा राज्यातील जनता मतदानातून योग्य ते उत्तर देईल, असा विश्वास भाजपाचे प्रवक्ते भरत पांड्या यांनी व्यक्त केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound