जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वि.पाटील विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला जल्लोषात सुरुवात करण्यात आली. सदर महोत्सव दि. १७ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांनी राबविण्यात येणार आहे.
त्यात झेंडा बनवणे कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, वृक्षारोपण, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, सामूहिक झेंडावंदन, व्याख्यान, चित्रपट, घर घर तिरंगा हर घर तिरंगा असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
त्याचाच एक भाग म्हणून शाळेचे उपशिक्षक योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांची तिरंगा झेंडा तयार करण्याची कार्यशाळा घेतली त्यात विद्यार्थ्यांनी सुंदर झेंडे तयार केले. त्यानंतर योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना झेंड्या बद्दलचे सर्व नियम समजावून सांगितले.
प्रत्येकाने 15ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आपल्या घरावर झेंडा फडकवण्याचे अवाहान केले तसेच पालकांची सभा घेऊन मुख्या. रेखा पाटील यांनी हर घर तिरंगा अभियानाबद्दल मार्गदर्शन केले.
प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.