Home Cities जळगाव प.वि.पाटील विद्यालयात दीप अमावस्या उत्साहात

प.वि.पाटील विद्यालयात दीप अमावस्या उत्साहात

0
37


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश होऊदे दुष्ट शक्तींचा विनाश,  मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो दीप अमावास्येचा सण खास…. केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात दीप अमावास्येचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची दिवे , पणत्या , समई वापरून छान आरास विद्यालयात निर्माण केली व सर्वांच्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन ज्ञान ,आरोग्य ,ऐश्वर्य , शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त होवो अशी सर्व विद्यार्थ्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली व शुभंकरोती कल्यानं या श्लोकाचे पठण केले.

फुले, दिवे, पणत्या, तसेच लायटिंगचा वापर करून आकर्षक रोषणाई या वेळी करण्यात आली मुख्या. रेखा पाटील यांच्या हस्ते दिव्यांचे प्रज्वलन करण्यात आले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना दीप अमावस्येचे महत्व ही समजावून सांगितले.

सुशोभीकरणासाठी शाळेच्या माजी विद्यार्थिनी नंदिनी राठोड, स्नेहा सुरडकर, अश्विनी चौधरी, भाग्यश्री दुसाने, भारती मोरे, रोहिणी बिऱ्हाड़े, नयना जैन आदींनी अनमोल असे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले तर उपशिक्षिका चंचल ढाके , कल्पना पाटील , गायत्री पवार , सुनील नारखेडे , सुधीर वाणी आदींनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले.


Protected Content

Play sound