जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सर्व महिला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची निगडित एक तरी पुस्तक आम्ही नक्कीच वाचू असा संकल्प यावेळी सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी केला. विद्यार्थ्यांनी यावेळी सुंदर भाषणे केली तर काहींनी नाट्यछटा सादर केल्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली.
प्रसंगी कल्पना तायडे, दिपाली चौधरी, सूर्यकांत पाटील, धनश्री फालक, देवेंद्र चौधरी, सुनील नारखेडे, सुधीर वाणी आदी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच विश्र्वप कामळस्कर, संस्कृती पाटील, राज कोल्हे , केदार चव्हाण आदी विद्यार्थी उपस्थित होते