जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भावांनी शेतीचा हिस्सा न दिल्यामुळे कर्ज भरु शकलो नाही. भावांनी हिस्सा दिला असता तर ती जमीन विकून कर्ज फेडून टाकल असते. अश रेकॉर्डींग करीत संजय चावदस सपकाळे (वय-५८, रा. कासमवाडी) यांनी आसोदा रेल्वेगेटजवळ धावत्या खाली झोकून देत आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केलेल्याप्रकरणी त्यांच्या भावंडाविरुद्ध बुधवारी २४ मे रोजी दुपारी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कासमवाडी परिसरात संजय सपकाळे हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. मंगळवारी त्यांची पत्नी घरी असतांना त्यांचा भाऊ गजानन सोनवणे याने आपल्या बहिणीला फोन करुन मेहुणे हे रेल्वेखाली येवून मयत झाल्याचे सांगितले. त्यांनी मरण्यापुर्वी मोबाईलमध्ये रेकॉर्डींग केली होती. ती रेकॉर्डींग गजानन सोनवणे यांनी आपल्या बहिणीला ऐकवली, त्या रेकॉर्डींगमध्ये संजय सपकाळे यांनी म्हटले की, भावाने मला हिस्सा न दिल्याने मी कर्ज भरु शकलो नाही. आधार सपकाळे, शांताराम सपकाळे व इतर काही लोकांमूळे मी आत्महत्या करीत आहे. तसेच व्याजावाले आण्णा ठाकूर व निलेश ठाकूर यांनी मला मारहाण केली, यामध्ये माझा हात मोडून टाकला असल्याचे रेकॉर्डींगमध्ये त्यांनी म्हटले आहे.
मरणाआधी सपकाळे यांनी पत्नीला भावांनी आपल्याला हिसस्याची जमीन दिली तर विकून कर्ज फेडून टाकू असे बोलले होते. परंतु त्यांच्या दोघ भावांनी हिस्सा न दिल्याने त्यांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताची पत्नी कल्पना सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आधार चावदस सपकाळे व शांताराम चावदस सपकाळे यांच्याविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.