जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोंबडी बाजारातील बुरहाणपूर जिलेबी दुकानासमोर अज्ञात दोन जणांनी एका व्यक्तीच्या पॅटच्या खिश्यातून ५ हजार २०० रूपयांची रोकड बजरी काढून पसार झाल्याची घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, हरीष गोपाल पाटील (वय-४६) रा. यवतमाळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नोकरीच्या निमित्ताने ते जळगावात आलेले आहेत. शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता हरीष पाटील हे जळगाव शहरातील कोंबडी बाजार जवळील बुरहाणपूर जिलेबी दुकानाजवळ आले असता अज्ञात दोन जणांनी त्यांचा रस्ता आडविला. त्यांच्या पॅटच्या खिश्यातील ५ हजार २०० रूपयांची रोकड जबरी काढून लांबविल्याची घटना समोर आली आहे. हरीष पाटील यांनी दोघांचा पाठलाग केला परंतू तोपर्यंत दोघे भामटे पसार झाले होते. शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विजय निकुंभ हे करीत आहे.