प्रियकराच्या खुनासाठी मित्राला शरीरसुखाचे आमिष

 

 

नागपूर : वृत्तसंस्था । लग्नात आठकाठी आणणाऱ्या प्रियकराच्या हत्येसाठी तरुणीने त्याच्या मित्राला  दीड लाखांची सुपारी व शरीरसुखाच आमिष दाखवले . त्यानंतर सर्वांनी कट रचून प्रियकराला संपवले, स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांनी चौघांनी अटक केली.

 

२५ फेब्रुवारीला कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काब्रा खाणीत २०० फूट खाली एक मृतदेह सापडला. त्याची अतिशय निर्घृणपणे हत्या करुन त्याचा खून करण्यात आला होता. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन मृतदेहाची ओळख पटवली. पाचगाव येथील चंदू गंगाधार महापूर (वय ३०) असे मृताची ओळख पटली. पोलिसांनी चौकशी केली असता तो विवाहित असून दोन मुलांचा बाप असल्याचे कळले.

 

गावातील एका मुलीशी त्याचे अनैतिक संबंध होते. तिच्याशी तो विवाह करीत नव्हाता. तिचे आईवडील व तीने नागपुरातील एका तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला असता तो आठकाठी निर्णाण करायचा. त्यामुळे प्रेयसी व तिचे आईवदील संतापले होते. त्यांनी चंदूचा मित्र भारत वसंता गुजर (वय २५, रा सालईमेंढा) याला हाताशी धरले.

 

चंदूच्या प्रेयसीने भरतला चंदूला संपवण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी व शरीरसुखाचे आणिष दिले. त्यानंतर भारत हा चंदूला दारु प्यायला घेऊन गेला व खाण परिसरात नेऊन दगडाने ठेचून खून केला. जवळपास २०० मीटर मृतदेह फरफकट नेऊन खाणीत फेकला. पोलिसांना मित्रावर संशय येताच त्यांनी भारतची कसून चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी भारतहस मृताची प्रेयसी व तिच्या आईवडिलांना अटक केली

Protected Content