रावेर प्रतिनिधी । राज्याचा आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार प्रितम शिरतुरे यांना मुबईत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते देण्यात आला. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अतिरीक्त मुख्य सचिव अजयकुमार सिंग यांची वितरण सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती.
आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कारार्थी प्रितम शिरतुरे यांनी रावेर तालुक्यात तब्बल १९ वर्ष सेवा दिली असून आता ते खडका व साकरी (ता.भुसावळ) येथे दिड वर्षापासून सेवा देत आहे. रावेर तालुक्यात त्यांनी केऱ्हाळा बु, पिंप्री, चोरवड, अजनाड, येथे सेवा दिली आहे.तर सर्वाधिक सेवा ऐनपुर येथे ८ वर्ष दिली आहे. येथे असतांना त्यांनी शासना कडून मिळणारे सर्व पुरस्कार ऐनपुर (ता रावेर) यांना मिळवुन दिले आहे. त्यांनी वसूली, अपंगाचा खर्च,शासनाचे विविध अभियान राबविणे, घरकुल, दलित वस्ती, इत्यादी योजना त्यांनी प्रभावी पणे राबविले आहे. तसेच यापुर्वी त्यांना जिल्हाच्या आर्दश ग्राम सेवक पुरस्कार देखिल मिळाला आहे. जनता व सरपंच सदस्य यांच्या कमालीचा समन्वयक साधुन प्रत्येकाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे म्हणून ते संपूर्ण तालुक्यात चांगलेच परीचित आहे. हा पुरस्कार वितरीत झाल्या बद्दल राज्यचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, राज्यकोषाध्यक्ष संजीव निकम, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, राज्य प्रसिध्दी प्रमुख बापु अहिरे, सरचिटणीस श्री जामोदे, जिल्हाध्यक्ष श्री गोराडे, जिल्हा सचिव संजय भारंबे, उपाध्यक्ष अशोक खैरनार,जिल्हा मांनद सचीव गौतम वाडे, कर्मचारी महासंघाचे प्रशांत तायडे रावेर व भुसावळ तालुक्यासह जिल्हाभरातील ग्राम सेवक, विविध राजकीय पदाधिकारी,व जनतेतुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
पुरस्काराने भारावलो चांगल्या कामांची दखल
ग्राम पंचायत स्तरावर कोणताही-भेदभाव न करता आता पर्यंत सेवा दिली आहे.शासनाच्या प्रत्येक योजना जनते पर्यंत पोहचविल्या गाव-पातळीवर काम करत असतांना अनेक वेळा मुलांकडे ही दुर्लक्ष झाले परंतु कामांकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही आमच्या ग्राम विकास आधिकाऱ्यांचा सर्वाच्च पुरस्कार मिळाल्याने भारावलो असून शासनाने चांगल्या कामांची दखल घेऊन माझा गौरव केला यामुळे अजुन आहे त्यापेक्षा चांगल्या पध्दतीने ग्राम पंचायत स्तरावर काम करण्याची ऊर्जा मिळणार असल्याचे पुरस्कारप्राप्त ग्राम विकास अधिकारी प्रितम शिरतुरे यांनी बोलतांना सांगितले.