प्रा.सुनिता गुंजाळ यांचा सत्कार

पाचोरा, प्रतिनिधी । प्रा. सुनिता गुंजाळ यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची मराठी विषयातून पीएच.डी.पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 

प्रा. सुनिता गुंजाळ ह्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यपक आहेत. प्रा. गुंजाळ यांनी पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले सरांच्या मार्गदर्शनाने `सन २००० ते २०१० या कालखंडातील निवडक कथांचा अभ्यास´या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. तसेच संस्थेच्या भडगाव महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. एस. जी. शेलार यांनाही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विषयातून पीएच. डी.पदवी मिळाली. या निमित्ताने संस्था परिवार व महाविद्यालय परिवाराच्यावतीने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ व व्हा. चेअरमन विलास टी. जोशी यांनी दोघांचा सत्कार केला.  यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन सुरेश देवरे, संस्थेचे संचालक वासू  महाजन, सतिष चौधरी, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील, प्रा. एल. जी. कांबळे, उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, प्रा. संजू एम. पाटील, प्रा. आर. एस. मांडोळे, डॉ. अतुल देशमुख, प्रा. स्वप्नील भोसले, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Protected Content