प्रहार जनशक्तीच्या प्रयत्नांनी शहिद जवानाच्या परीवाराचा होणार सन्मान !

 

जामनेर : प्रतिनिधी । प्रहार जनशक्ती पक्ष जामनेर तालुका यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील २१ वर्षिय शहिद यश दिगंबर देशमुख यांचे परीवाराचा स्वातंत्र्य दिनी indian idol sony tv या नँशनल शो मध्ये मुंबई येथे  सन्मान करून मदत दिली जाणार आहे 

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने सोनी टीव्ही वर विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून  चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावच्या शहीद यश देशमुख यांचे वीर स्मरण करण्यात येईल .

  गतवर्षी जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी लढतांना  दहशतवादी हल्ल्यात पिंपळगाव येथील जवान यश देशमुख वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी शहीद झाले होते . त्यांचा सन्मान व्हावा म्हणून देशमुख परिवाराला सोनी टीव्हीच्या इंडियन आयडॉल या रियालिटी शोमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.

याकामी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले,  प्रहार जनशक्ती पक्ष जामनेरचे कार्यकर्ते मनोजकुमार महाले  [संपादक – आयबीएन एकमत न्युज ] , प्रहार जनशक्ती संघटनेचे जामनेर तालुक्यातील वरिष्ठ नेते प्रदीप गायके (वरिष्ठ पत्रकार व संपादक )  , जितेंद्र माळी [ व्हिडीओजर्नालिस्ट आयबीएन एकमत न्युज ] ,मनोज दुसाने [ व्हिडीओ एडीटर – जीएम न्युज ] या टीमने सोनी टीव्हीशी संपर्क करून आमच्या जिल्ह्यातील शहीद यश देशमुख यांना सन्मानित करण्यात यावे अशी सूचना केली . याची दखल घेऊन सोनी टीव्हीने देशमुख परिवाराचा सन्मान करण्यात येणार असल्याचे जाहीर केले !

 

Protected Content