जळगाव प्रतिनिधी । शहरातील तापी पाटबंधारे कार्यालयात खासदार उन्मेश पाटील यांनी आज रोजी दुपारी विविध कामांचा आढावा घेतला. यात लवकरात लवकर प्रस्तावीत सिंचन प्रकल्पाची कामे मार्गी लावा अश्या सुचना संबंधित विभागाला देण्यात आले आहे.
खासदार उन्मेश पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रामुख्याने वरखेडे लोंढे प्रकल्पावर प्रस्तावित बंदिस्त कालव्याच्या कामाला गती द्यावी, तामसवाडी पुनर्वसनासाठी आठ दिवसात बैठक बोलावून त्यावर तोडगा काढावा, सात बलुन बंधारे गुंतवणूक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तातडीने कार्यवाही करावे, तापी प्रकल्पाला पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश करावा, त्याचप्रमाणे १५ दिवसात दिवसात झालेल्या कार्यवाहीची माहिती देण्याच्या सुचना देवून लवकरात लवकर प्रस्तावीत सिंचन प्रकल्पाची कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहे.
याबैठकीला तापी पाटबंधारे मुख्य अभियंता जे.डी. बोरकर, अधिक्षकय अभियंता वाय.के. भदाणे, गिरण कडाचे अधीक्षक अभियंता श्रीकांत दळवी, कंत्राटदाराचे प्रकल्प तांत्रिक सल्लागार पी.आर. पाटील, कार्यकारी अभियंता संतोष भोसले, उपसा सिंचने कार्यकारी अभियंता यशोदीप कडलग, निम्न तापी प्रकल्प विभागाचे कार्यकारी मुकुंद चौधरी, लघु पाटबंधारी विभागाचे कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे, कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल, ईश्वर पढार, कामेश पाटील, सचिन पाटील, सेवानिवृत्त अभियंता आर.डी. पाटील आदी उपस्थिती होते.