जळगाव, प्रतिनिधी | एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या १६ दिवसांपासून कामबंद संप पुकारण्यात आला आहे. प्रतिक्षा यादीतील नवीन चालकांना प्रशिक्षणास वैद्यकीय प्रमाणपत्र व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिल्याशिवाय नवीन बस चालकांच्या बस ताब्यात देवू नये, अन्यथा बस रस्त्यावर धावू देणार नाही, असा पवित्रा मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमिल देशपांडे यांनी घेतला. रविवारी २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितले.
एसटी महामंडळ प्रतिक्षा यादीवरील ५० वाहन चालक यांना रविवारपासून नियुक्तीपत्र देऊन एसटी त्यांच्या हातात देणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रतिक्षा यादीवरील चालक यांची निवड ६ महिन्यांपुर्वी झाली आहे. त्यांचे प्रशिक्षण सुध्दा ६ महिन्यांपुर्वी झाली आहे. एसटीच्या नियमानुसार नियमित वाहन चालकसुध्दा १० ते १५ दिवस सुटीवर असल्यास त्यांना पुन्हा तीन दिवसाचे प्रशिक्षण देऊन मग कामावर हजर केले जाते. अशा परिस्थीतीत ६ महिन्यांपुर्वी प्रशिक्षण झालेल्या उमदवारांना पुन्हा १० दिवसाचे प्रशिक्षण देण्यात यावे आणि मग त्यांना एसटी चालवू द्यावी अशी मागणी त्यांनी शनिवारी देखील केली होती. परंतू बस विभाग नियंत्रक यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यानुसार रविवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता संपकरी एसटी कर्मचारी यांच्या आंदोलनात सहभाग घेवून प्रशिक्षण दिलेल्या वाहन चालकांना बस चालवू द्या, अन्यथा बस धावू देणार नाही असा पवित्रा घेतला. याप्रसंगी ॲड. जमिल देशपांडे, राजेंद्र निकम, राजू बाविस्कर, म हेश माळी,गणेश नेरकर,गोविंद जाधव,विशाल कुमावत, निलेश अजमेरा, संतोष सुरवाडे,र मेश भोई, मनोज भोई,.दिनेश चव्हाण,मंगेश भावे,सिध्देस कवठाळकर, गोरख गायकवाड, अजय परदेशी, भाईदास बोरसे, संदिप पाटील सतीश सैंदाणे सागर पाटील अविनाश जोशी योगेश पाटील योगेश पाटील विकास पाथरे आदी सहभागी झाले होते.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/236264345261361
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/310430467385898