मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विविध प्रलंबीत प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आज आमदार एकनाथराव खडसे यांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली.
चालू खरीप हंगामात बि बियाणे, रासायनिक खतांचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, बियाण्यांच्या होत असलेल्या काळाबाजाराला आळा बसावा इत्यादी कृषी विषयक समस्या
तसेच मुक्ताईनगर तहसील प्रशासनाकडे प्रलंबित असलेले शेत वहिवाट रस्ते प्रकरण, रेशनकार्ड समस्या, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना व इतर शासकीय योजनांच्या प्रलंबित प्रश्नां विषयी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या दालनात आढावा बैठक घेतली.
मुक्ताईनगर बोदवड रावेर तालुक्यात पुर्व हंगामी कपाशी लागवड सुरू असुन
यातालुक्यात कबड्डी, ले पंगा या वाणाची मागणी जास्त आहे. ८५० रुपये प्रती पाकिट विक्री किंमत असलेल्या या बियाण्यांची १२०० रुपये प्रती पाकिट प्रमाणे काळ्याबाजारात विक्री होत आहे ही बाब एकनाथराव खडसे यांनी कृषी विभागाच्या निदर्शनास आणून दिली. यावर बियाणे उपलब्ध असलेल्या कृषी केंद्रावर कृषी विभागाचे अधिकारी थांबुन त्यांच्या उपस्थितीत बियाण्यांची विक्री होईल असे जिल्हा कृषी अधिक्षक यांनी सांगितले. यावेळी रासायनिक खत्यांच्या साठ्याचा आढावा घेण्यात आला.
कृषी केंद्रांवर उपलब्ध असलेल्या बियाणे, रासायनिक खते यांच्या साठ्याची माहिती कृषी केंद्रा बाहेर फलकावर लावण्यात यावी असे निर्देश एकनाथराव खडसे यांनी दिले. यावेळी मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यात कृषी साहाय्यकांची पदे रिक्त असल्याची बाब तालुका कृषी अधिकारी यांनी आ. एकनाथराव खडसे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर आ. एकनाथराव खडसे यांनी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांच्या सोबत दूरध्वनी वरून चर्चा करून रिक्त पदे भरण्याची मागणी केली.
त्यानंतर मुक्ताईनगर तहसील प्रशासना कडे नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये भुमी अभिलेख कार्यालयाने पोट खराब जमिन संबंधित ५७५ प्रकरणे परत पाठविल्या बाबत आ एकनाथराव खडसे यांनी प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावर येत्या सात दिवसात सर्व प्रकरणे निकालात काढण्यात येतील व पोट खराब क्षेत्र दुरुस्त करून देण्यात येईल असे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले. तसेच तालुका दंडाधिकारी यांच्याकडे प्रलंबित असलेले रस्त्यांचे वहिवाट प्रकरणे विशेष शिबीर घेऊन निकाली काढण्याचे प्रांताधिकारी यांनी तहसीलदार यांना निर्देश दिले.
संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, कुटुंब अर्थ साहाय्य योजना या योजनांचे सन २०२२ मधील बाराशे प्रकरण प्रलंबित आहेत. यानंतरची प्रकरणे मंजूर झाली पण २०२२ मधील हे प्रकरणे मंजूर करण्यात येत नसुन या प्रकरणाच्या मंजूरी किंवा त्रुटी विषयी लाभार्थ्यांना माहिती दिली जात नाही ही बाब रोहिणी खडसे यांनी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिली. यावर प्रांताधिकारी यांनी येत्या आठवडा भरात सर्व प्रकरणे निकाली काढण्यात यावेत असे तहसील प्रशासनास निर्देश दिले. तसेच रेशन कार्डांच्या समस्या निकाली काढण्यात याव्यात असे प्रांताधिकारी यांनी तहसीलदार ,पुरवठा अधिकारी यांना निर्देश दिले.
यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक संभाजी ठाकूर, भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, मुक्ताई सूतगिरणी चेअरमन रोहिणी खडसे, नायब तहसीलदार वाडकर, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष यु डी पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे,माजी जि प सदस्य निलेश पाटील, हरिष ससाणे,सुनिल काटे, प्राजक्ता चौधरी,नंदकिशोर हिरोळे,संजय कोळी,विजय चौधरी, प्रदीप बडगुजर,रउफ खान,संजय माळी,निंबाजी चौधरी,साहेबराव पाटील उपस्थित होते