Home आरोग्य प्रयत्नपूर्वक बदलांनी मधुमेह पूर्णपणे होतो बरा- डॉ. जगन्नाथ दीक्षित

प्रयत्नपूर्वक बदलांनी मधुमेह पूर्णपणे होतो बरा- डॉ. जगन्नाथ दीक्षित

0
44

जळगाव प्रतिनिधी । योग्य तो डाएट प्लॅन आणि याच्या जोडीला व्यायामाची जोड दिल्यास मधुमेहासारखा विकार पूर्णपणे बरा होत असल्याचा दावा डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केला. ते राष्ट्रसेवा फाऊंडेशनतर्फे आयोजित वेट लॉस व मधुमेह प्रतिबंध विषयावरील व्याख्यानात बोलत होते.

मान्यवर उपस्थित

या कार्यक्रमाला आमदार राजुमामा भोळे, आमदार चंदुलाल पटेल, महापौर सिमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे, मनपा स्थायी सभापती जितेंद्र मराठे, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, भरत अमळकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले की, कडक भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा दिवसातून त्या दोन वेळानाच जेवण करा आणि प्रत्येक जेवणाचा कालावधी जास्त ५५ मिनिटे हा डाएट प्लॅन व त्यांच्या जोडीला दिवसाला किमान ४५ मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम तसेच आहार व जीवनशैलीत बदल करून मधुमेह पूर्णतः बरा होतो.

बकाबका खाऊ नका

डॉ. दीक्षित पुढे म्हणाले की, सध्या अनेकांसमोर वाढते वजन, मधुमेहाचा मोठा प्रश्‍न आहे. वजन वाढले. मधुमेह वाढला. आता त्यावर नियंत्रण कसे ठेवावे, वजन कसे कमी करावे, या चिंता माणसाला सतावतात. वजन आणि मधुमेह यापासून दूर राहायचे असेल, तर सर्व काही खा; परंतु खाण्यावर नियंत्रण ठेवा, बकाबका खाऊ नका, दिवसातून दोन वेळा खा, योगा, व्यायाम आणि पायी फिरण्याकडे लक्ष द्या, असा मोलाचा सल्ला डॉ. दीक्षित यांनी दिला.

रात्री केवळ फळ खा

ते पुढे म्हणाले की, वजन का वाढत आहे, याचा विचार करा. मुले सर्रास कोल्ड्रिंक्स, बर्गर, पिझ्झा खाताना दिसतात. वय, लिंग, आनुवंशिक घटक, सामाजिक-आर्थिक परिस्थिती, मेहनतीचा अभाव, भोजन बनविण्याची पद्धती, शिक्षण, हार्मोन्स, मद्यपान, धूम्रपान, वंश आदी वजन वाढण्याची कारणे आहेत. अनेकांना वजन कमी करायचे असते; परंतु त्यासाठी शारीरिक श्रम अनेकांना नको असतात. त्यांना शॉर्टकट पद्धत हवी असते. वजन कमी करायचे असेल, तर एक दिवस उपवास करा, रात्री केवळ फळ खा, रसाहार, निराहार करा, दर तीन तासांनी थोडेथोडे खा, तसेच आयुर्वेदिक, होमिओपॅथीची औषधे घ्या, असे त्यांनी सांगतीले.

भोजनाची वेळ निश्‍चित करा

डॉ. दीक्षित पुढे म्हणाले की, खाण्यासाठी जीवन जगू नका, तर जगण्यासाठी खा…जे काही खायचे आहे, ते खा; परंतु दिवसातून दोन वेळा खा, तुम्ही काहीही खाल्ले तरी शरीरात इन्सुलिन निर्माण होते. वजन आणि मधुमेहाला प्रतिबंध करायचा असेल, तर खूप भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा, भोजनाची वेळ निश्‍चित करा आणि त्याच वेळेत भोजन करा, तसेच ५५ मिनिटांमध्ये भोजन संपवा, असे सांगत त्यांनी दोन भोजनाच्या मधात काही खाऊ नका आणि गोड कमी खा, आहारात प्रोटिन्स वाढविण्याचा सल्लाही त्यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound