प्रभात चौकात ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रभात चौकात महामार्गावरील बोगद्याजवळ ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत ट्रॅक्टरचे चाक पायावरुन गेल्याने दुचाकीस्वार तरुण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील धनगरवाडा येथे राहूल ऊर्फ उमेश जर्नादन निकुंभ वय २६ हा तरुण वास्तव्यास आहेत. मंगळवारी दुपारी राहूल हा त्याच्या एम.एच.१९. सी.पी. ०४७० या क्रमाकांच्या दुचाकीने जळगाव शहरातील प्रभात चौक परिसरातून जात असतांना महामार्गावर बोगद्याजवळ रॉग साईडने येणाऱ्या वीटांनी भरलेल्या ट्रॅक्टरने राहूल याच्या दुचाकीला धडक दिली, या धडकेत राहूल हा दुचाकीवरुन खाली पडला, त्यानंतर ट्रॅक्टरचे चाक त्याच्या पायावरुन गेल्याने त्यास दुखापत झाली तसेच दुचाकीचे नुकसान झाले. अपघानंतर ट्रॅक्टरचालक हा घटनास्थळावरुन पसार झाला होता, याप्रकरणी राहूल निकुंभ याने दिलेल्या तक्रारीवरुन ट्रॅक्टरवरील चालकाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक हे करीत आहेत.

Protected Content