प्रभाग समिती ३ मध्ये नागरिकांची अॅन्टीजन टेस्ट

 

जळगाव,प्रतिनिधी  ।  शहरात कोरोना संसर्ग वाढत असून महापालिकेतर्फे नागरिकांसाठी अॅन्टीजन  टेस्ट कॅम्प घेण्यात येत आहे. यानुसार आज रविवार १८ एप्रिल रोजी वार्ड क्र. १३ व १४ मधील नागरिकांची  अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली.

प्रभाग समिती ३ अंतर्गत वार्ड क्र. १३ व १४ मधील  नागरिकांची अॅन्टीजन टेस्ट लायन्स हॉल येथे  करण्यात आली. यावेळी ३३ नागरिकांची चाचणी करण्यात आली असता सर्व निगेटिव्ह आले आहेत.   याप्रसंगी  प्रभाग समिती ३ चे प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण, डॉ. सुजाता परमार  ,नर्स ममता बनसोडे, आशा वर्कर, वार्डातील नगरसेविका  ज्योती बाळासाहेब चव्हाण व   अशोक जाधव, समाजसेवक बाळा कंखरे  आदी उपस्थित होते.

 

Protected Content