जामनेर प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्यातर्फे पाणपोईची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
जामनेर येथे कोरोना आजाराच्या पर्श्वभूमीवर जे आरोग्य कर्मचारी, स्वच्छता दूत तसेच पोलीस प्रशासन असेल जे आपले कर्तव्य चोक पणे पार पडत आहे किंवा इतर नागरिक जे आत्यवश्यक सेवेसाठी घराच्या बाहेर पडत आहेत, त्यांच्यासाठी अशा रणरणत्या उन्हात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून प्रफुल्ल लोढा यांच्या तर्फे पाणपोई उपलब्ध करण्यात आली. त्यांच्या या दातृत्वाचे परिसरातून कौतुक होत आहे.