मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या आर. डी. परेडसाठी श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयातील प्रफुल्ल प्रभाकर यमनेरे या विद्यार्थ्याची निवड झाली. त्याच्या या निवडीबद्दल आ. एकनाथराव खडसे, संस्थेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, संचालक मंडळ व शिक्षकांनी अभिनंदन केले.
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयातील प्रफुल्ल प्रभाकर यमनेरे तृतीय वर्ष बी. एस्सी. या विद्यार्थ्याची दिनांक १९ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान सरदार वल्लभाई पटेल विद्यापीठ,आनंदनगर (गुजरात) येथे महाराष्ट्र संघातून पश्चिम विभाग निवड चाचणीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी – उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत सहभागी झाला होता.
आ. एकनाथराव खडसे व मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी विशेष अभिनंदन करून २६ जानेवारी २०२३ रोजी नवी दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी प्रफुलची निवड होईल अशी आशा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या होत्या. या निवड चाचणीचा निकाल नुकताच प्राप्त झाला. प्रफुल्ल प्रभाकर यमनेरे या विद्यार्थ्याने त्यांचे म्हणणे सार्थ ठरवले. नवी दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या २६ जानेवारी २०२३ च्या आर. डी. परेड साठी प्रफुल ची निवड झाली…! त्याबद्दल प्रफुल्ल प्रभाकर यमनेरे या विद्यार्थ्याचे तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन, उपप्राचार्य डॉ. ए. पी. पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. बी. डांगे , सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. डी.एन. बावस्कर व महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. ताहिरा मीरा आशिक हुसेन यांचे संस्थेच्या चेअरमन अँड रोहिणीखडसे खेवलकर, सचिव डॉ. सी. एस. चौधरी, व्हा. चेअरमन नारायण नामदेव चौधरी व सर्व संचालक मंडळाने, तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले.