प्रधानमंत्री फसल विमा योजनेत समावेशासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत

 

जळगाव, प्रतिनिधी । प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन 2020-21 करीता जिल्ह्यास लागु करण्यात आली आहे. त्यानुसार कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक असणा-या या योजनेत सहभागाची अंतिम मुदत मोसंबी व केळी पिकासाठी 31 ऑक्टोबर, तर आंबा व डाळिंब पिकासाठी 31 डिसेंबर अशी आहे.

आंबिया बहारासाठी केळी या पिकाकरीता या कालावधीत मागील वर्षासाठी (सन 2019-20) लागु असणा-या हवामान धोक्यांमध्ये शासन निर्णयानुसार बदल करण्यात आले होते. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी हवामान धोक्यांमध्ये केलेला बदल हा शेतक-यांना अन्यायकारक असल्याचे केळी पिकाकरीता मागील वर्षी (सन 2019-20) लागु असलेले हवामान धोके सन 2020-21 या वर्षाकरीता गृहीत धरणेबाबत मागणी करण्यात आली होती.

या मागणीनुसार हवामान धोके बदलाबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेमार्फत राज्य शासनास सादर करण्यात आला. परंतु सदरचा निर्णय केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याने तसा प्रस्ताव राज्य शासनामार्फत दि. 16 सप्टेंबरच्या पत्रान्वये केंद्र शासनास सादर करण्यात आला होता. मात्र, केंद्र शासनामार्फत दि. 6 ऑक्टोबरचे पत्रान्वये सन 2020-21 ला लागू केलेले हवामान धोके एक वर्षाकरीता कायम ठेवण्याबाबत राज्य शासनास कळविले आहे असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content