पुणे : वृत्तसंस्था । आयकर विभागात सह आयुक्त म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल मच्छिंद्र भोसले यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या ‘फिरस्त्या’ या मराठी चिटपटाचं ११ देशांमध्ये कौतुक झालं आहे.
जगभरातील आंतरराष्ट्रीय चिटपट महोत्सवापूर्वीच या चित्रपटाने ५३ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. निराशेच्या गर्ततेत अडकलेल्यांना आत्मविश्वास देणाऱ्या या चित्रपटाची आता उत्सुकता निर्माण झालीय.
सकारात्मकतेचं बीज पेरणारा ‘फिरस्त्या’ हा चित्रपट प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत यशापर्यंत पोहचण्याची धडपड करणाऱ्या खेडेगावातील एका होतकरू मुलाची कथा आहे. ग्रामीण भागात निरक्षर आणि आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाची खऱ्या अनुभवांवर आधारित ही गोष्ट आहे. ‘फिरस्त्या’ म्हणजे एक विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी वेगवेगळी गावं, शहकं अशी भटकंती करणारा, फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून आकाशाकडे झेप घेऊ पाहणाऱा ध्येयवेडा मुलगा.
प्रदर्शनापूर्वीच ‘फिरस्त्या’ने भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंड, जपान, फ्रान्स, रोमानिया अशा ११ देशांमधील विविध चित्रपट महोत्सवात एकूण ५४ पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. यामध्ये १८ पुरस्कार हे सर्वोत्कष्ट चित्रपटासाठी मिळाले आहेत. तर विठ्ठल मच्छिंद्र भोसले यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी १७ पुरस्कार प्रात्प झाले आहेत. तसंच विविध श्रेणीत या सिनेमाला पुरस्कार मिळाले आहेत.
चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक असेलेल्या विठ्ठल मच्छिंद्र भोसले यांनी कोणतही प्रशिक्षण न घेता केवळ इंटरनेट आणि यूट्यूबवरील माहितीच्या आधारे चित्रपट तयार केलाय. या सिनेमात ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिमन्यू म्हणजे अभिनेता समीर परांजपे, हरिष बारस्कर, अंजली जोगळेकर, समर्थ जाधव या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.