याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन लक्ष्मण देवरे (वय-४१) रा. प्रज्ञा नगर निमखेडी शिवार जळगाव हे आपले आई यांच्यासह वास्तव्याला आहे. सचिन देवरे हे १२ एप्रिल रोजी आईसोबत बाहेरगावी राहत असलेल्या भावाकडे घराला कुलूप लावून गेले होते. एक महिन्यानंतर म्हणजे गुरूवार १२ मे रोजी सकाळी जळगाव ते राहत्या घरी आले. त्यावेळी त्यांच्या घरातील इन्वर्टर व बॅटरी असा एकूण ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले. याबाबत सचिन देवरे यांनी तातडीने जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी १२ मे रोजी रात्री १२ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.
प्रज्ञा नगरातून इन्व्हर्टरसह बॅटरीची चोरी
3 years ago
No Comments