जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपल्या कलागुणांच्या बळावर मनाच्या आत दडलेल्या प्रतिमेला एक नवे वळण मिळावे व आपल्या सुप्त गुणांना चालना मिळावी या उदात्त हेतूने महाविद्यालयांमध्ये फिनिक्स २के२३ (टेक्निकल इव्हेंट) च्या पोस्टेरॉलिक, कॅड मॅडनेस, शार्क टँक, वेब स्पार्क, ब्लाइंड कोडींग, इक्वेशन मेनिया हे प्रकल्प प्रदर्शन भावी अभियंत्यासाठी नवे व्यासपिठ असल्याचे मत गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वर्षा पाटील बोलत होत्या. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून (प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव), डॉ.गजानन माळवटकर, विनोद पंडित(व्यवस्थापक जैन फार्म फ्रेश, जळगाव),डॉ. पराग एम. पाटील(प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव) उपस्थित होते. तसेच उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे (समन्वयक, तंत्रनिकेतन) प्रा.हेमंत इंगळे (अधिष्ठाता), फिनिक्स कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.तृषाली शिंपी, प्रा. शफीकूर रहमान अन्सारी हे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. वर्षा पाटील पुढे म्हणाल्या की, नवनवीन संकल्पना जागतिक स्तरावर आपले महत्त्व सिद्ध करीत आहेत. त्या संकल्पनांचा अभ्यास विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. बाहेरील जगाला ज्या कलागुणांचे अपेक्षा विद्यार्थ्यांकडून असते ते कला गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे असते. ते अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असून कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सुरुवातीला दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात फिनिक्सचे समन्वयक प्रा.तृषाली शिंपी यांनी कार्यक्रमात सादर करण्यात येणार्या सर्व इव्हेंटची माहिती दिली. तसेच स्पॉट एन्ट्रीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी फिनिक्स कार्यक्रमाबद्दल माहिती देताना महाविद्यालयामध्ये वीस वर्षापासून हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे असे सांगत कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळते व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. पराग पाटील यांनी विद्यार्थ्यांना विशिष्ट चाकोरी मध्ये न राहता किंवा फक्त पुस्तकी ज्ञान न बाळगता अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन प्रकारचे ज्ञान घ्यावे, जेणेकरून या ज्ञानाचा उपयोग बाहेरील जगात त्यांना करता येईल. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रेरणादायक उदाहरणे दिली.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनोद पंडित यांनी फिनिक्स कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्व आयोजक विद्यार्थी याचे कौतुक व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
फिनिक्स २०२३ मध्ये ३०० स्पर्धकांचा सहभाग
फिनिक्स २०२३ या कार्यक्रमांमध्ये ३०० च्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या टेक्निकल इव्हेंटमध्ये जळगाव जिल्हा तसेच धुळे, मलकापूर, बुलढाणा, नंदुरबार या भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या मध्ये सहभाग नोंदविला होता.पारितोषिक समारंभाला डॉ. गजानन माळवटकर हे उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयामार्फत प्रथम पारितोषिक ३००० रुपये, द्वितीय पारितोषिक २००० रुपये व तृतीय पारितोषिक १००० रुपये असे बक्षीस तसेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला कॅड सेंटरचे अविनाश साखरे हे उपस्थित होते.
पारितोषिक विजेते विद्यार्थी
पोस्टेरॉलिक कॉम्पिटिशन विपुल जूनघरे, आर्यन जाधव, सारंग पाटील, ग्रीष्मा पाटील कॅड मॅडनेस कुणाल कावळे, कलश खंडारे, रुकसाना तडवी शार्क टँक साहिल कच्छी, सर्वेश चौधरी, प्रशांत पाटील, मयूर पाटील वेब स्पार्क असद पटेल, अमान पटेल, अनस देशमुख, कल्याणी बोंडे ब्लाइंड कोडींग मृगेश पाटील, सुयोग रावते, वरूण पाटील इक्वेशन मेनिया चिराग खडके, स्नेहा रोझतकर, चेतना महाजन, प्रोजेक्ट एक्जीबिशन श्रद्धा पाटील, वैष्णवी पाटील, तनिष वाणी, देवेश पाटील, जयेश वानखेडे, वैभव दैवज्ञ, दुर्वांकुर सोनार, उमेश राणे, भावेश कपोटे, कुंदा फिरके यांना पारितोषिक देण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन खुशबू पाटील व माधुरी निकम या विद्यार्थिनींनी केले. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. शफिकूर रहमान अन्सारी व प्रा. तृषाली शिंपी तसेच सर्व कमिटी मध्ये असलेले शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.