पोहण्यासाठी गेलल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; हिंगोली येथील घटना

हिंगोली वृत्तसंस्था । शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेणारे पाच युवक पोहण्यासाठी ईसापुर धरणावर गेले होते. मोरगव्हाण परिसरातील कालव्यात शेनवडी येथे पोहत असताना दोघे पाण्यात बुडत असताना एकाने त्यांना वाचण्यासाठी पाण्यात उडी टाकून प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरल्याने त्याच्यासह पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला.

हिंगोली येथील शिवम सुधीर चोंडेकर (वय-२१), रोहित अनिल चित्तेवाड (वय-२०), योगेश गडप्पा (वय-२१), निखिल बोलके, व इतर एक हे पाच युवक रविवारी सकाळी ११ वाजता ईसापुर धरणावर पोहण्यासाठी गेले होते. मोरवाडी शिवारातील शेनोडी येथील पाण्यात हे पोहत होते, शिवम चोंडेकर,रोहित चित्तेवाड हे पाण्यात बुडत होते. त्यांना वाचवण्यासाठी योगेश गडप्पा त्याने पाण्यात उडी घेतली. मात्र त्या दोघांना वाचण्या योगेश अपयशी ठरला आणि त्याचाही त्या दोघा सोबत पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दुसरा एक पाण्यात बुडत असताना निखिल बोलके याने त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळवले. सदर घटनेची माहिती परिसरात होताच, परिसरातील लोक घटनास्थळी धावले. त्या मयत तिघांचे मृतदेह दुपारी दोनच्या सुमारास पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

Protected Content