
जळगाव, प्रतिनिधी । कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशात पोळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जोपासत नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमिरा गांधी परिवारातर्फे शेतकऱ्यांच्या सर्जा राजासाठी साज वाटप करण्याचे मोलाचे कार्य करण्यात येत असल्याचे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.

आज सुमीरा गांधी परिवार आणि नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे ३१ शेतकऱ्यांना पोळ्याचा साज वाटप करण्यात आला. याप्रसंगी आमदर भोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी आ. लताताई सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उद्योजक संजय गांधी, नेहरू चौक मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांच्यासह शेतकरी रवींद्र गणपत पाटील हे उपस्थित होते. हा उपक्रम गेली ७ वर्षे नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमिरा परिवार यांच्यातर्फे राबविण्यात येत आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा असून बैलाच्या सजावटीच्या साहित्याने बाजार फुलले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि पिकांवरील रोग तसेच कोरोना संक्रमण यामुळे त्रस्त झालेले शेतकरी मात्र पोळा सणाकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना पोळ्यासाठी खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून पोळ्याचे साज देण्यात आले. यावेळी आ. लताताई सोनवणे यांनी, बळीराजा देशाचा पोशिंदा असून त्याला वंदन करून आपण मदत केली पाहिजे असे सांगितले. यानंतर शेतकऱ्यांना दोर, नाथ, म्होरक्या, गोंडे, सुताची लटी, गेठा असा पोळ्याचा साज पर्यावरणपूरक थैलीसह मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आला. यावेळी शेतक-यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रतापराव पाटील यांनी सांगितले की, आपल्या या शेतकरी बांधवाने त्याच्या शेतात काही पिकवले नाही तर आपण काय खाणार? आपण कसे जगणार? त्याला बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. म्हणून त्याला आधार देणे गरजेचे आहे. हे काम आपणच त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून करू शकतो, असे म्हटले. प्रकाश आडते यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. याश्वितेसाठी रिकेश गांधी, पियुष गांधी यांच्यासह पंकज पाटील, रोहित शिरसाठ, दर्शन बारी, वैभव जगदाळे, धनंजय अमोदकर, प्रसाद विसपुते, शेखर सोनवणे, ऋषभ गांधी, चेतन माळी आदींनी कामकाज पहिले.
या शेतकऱ्यांना मिळाला लाभ
कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पोळ्याचा साज वाटप करण्यात आला. यात दीपक वानखेडे,पांडुरंग नारखेडे, बळीराम अत्तरदे, पिंटू काटे, भूषण धनगर, राकेश बारेला, विलास पाटील, समाधान पाटील, राजू पाटील, नाना पाटील, राहुल सावळे, नरेंद्र सावळे, प्रदीप चौधरी, भारत कांचाने, नितीन चौधरी, बळीराम बारेला, उमेश पाटील, रावसाहेब पाटील, ज्ञानेश्वर हरणकर, भगवान शिंदे, समाधान पाटील, जनार्दन पाटील, रवींद्र पाटील, महेंद्र शिरसाठ, बबलू बारी आदी शेतकऱ्यांना साज वाटप झाला.
https://www.facebook.com/508992935887325/videos/603669927682220


