जळगाव, प्रतिनिधी । प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी वेटरनस इंडिया पेट्रोटिक आयोजित फिट इंडिया मुव्हीमेंट अंतर्गत पोलीस कराटे व स्केटिंग क्लब मध्ये एकूण १२० खेळाडूंनी व पालकांनी रनिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात एकूण ४१ पदके महाराष्ट्र संघटनेने पोलीस क्लबच्या विद्यार्थ्यांसाठी पाठविली होती. या पदकांचे वितरण पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वेटरनस इंडिया पेट्रोटिक रन्स या खुल्या स्पर्धेस पोलीस कराटे व स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी व पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवून धावण्याच्या शर्यतीचा आनंद लुटला व आपण किती फिट आहोत हे संदेश माहिला पालक यांनी साडी परिधान करून शर्यती संपून संदेश दिला होता.
स्वसंरक्षणाचे धडे महिला पालकांनी देखील घ्यावे : डॉ.प्रवीण मुंडे
पोलीस प्रशासनातर्फे सुरू असलेल्या पोलीस कराटे व स्केटिंग क्लबचा हेतू मुलांमध्ये एक चांगली शिस्त लावणे व त्यांना मोबाईल, व्हिडिओ गेमपासून लांब करून मैदानी खेळाकडे वाळविणे व आपल्या देशाचा उत्तम खेळाडू बनविणे हा ही हेतू आहे. कराटेचे प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी हिंसा न शिकता सेल्फ डिफेन्स शिकावे हा संदेश डॉ.प्रवीण मुंडे यांनी दिला. स्वसंरक्षणाचे धडे महिला पालकांनी देखील घ्यावे असे आवाहन ही केले. तसेच जळगाव जिल्हा पोलीस दल येणाऱ्या काळामध्ये स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. मुलांनी शिस्तबद्धरित्या कराटे व स्केटिंगचे प्रशिक्षण घ्यावे व भविष्यात राष्ट्रीय पातळीवर आपले नावलौकिक करावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.
डॉ. सई नेमाडे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाने पोलीस क्लबतर्फे महाराष्ट्रतील क्लब लेव्हल स्पर्धा आपल्या जिल्ह्यातील खेळाडुंसाठी सुरू करण्याचा प्रयत्न करावा जेणे करून आपले पोलीस दल अजून बळकट खेळाडू तयार करेल व स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना नवीन उंची गाठता येईल. पोलीस क्लब हे उत्तम शिस्त लावत आहे असे मनोगत डॉ.सई नेमाडे यांनी व्यक्त केले.
परेश सननसे विद्यार्थी पालक यांनी आपल्या पोलीस कराटे व स्केटिंग क्लब सुरू होण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. कोविड-19 मुलं खूप कंटाळली होती व त्यांना आता खूप आनंद होतोय की पुन्हा खेळायला कराटे व स्केटिंग क्लब सुरू केले. सध्या जिल्ह्यातील सर्वात मोठे क्लब म्हणून नावलौकिकता असलेले पोलीस क्लब उत्तम कार्य करत असल्याचे पालकांनी मनोगतातून मत व्यक्त केले.
कार्यक्रमच्या प्रसंगी पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी डॉ. अमृता मुंडे, आर. पी. आय. संतोष सोनवणे, मानव संसाधन विभागाचे पी. आय. अरुण धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी कराटे व स्केटींग चे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
विजय स्पर्धक खलील प्रमाणे:-
पहिला ग्रुप मुले प्रथम – शान तडवी, द्वितीय – मानस काळे , तृतीय – अंशुल खेळवाळे, पहिला ग्रुप मुली प्रथम – मृणाल देशमुख, द्वितीय – पारुल पाटील , तृतीय – स्वरा चौधरी .
दुसरा ग्रुप मुले प्रथम – आर्यन पाटील, द्वितीय – पूर्वेश विधाते, तृतीय – कौस्तुभ जंजाळे , दुसरा ग्रुप मुली प्रथम – पूर्वा पाटील, द्वितीय – छवी शिंपी, तृतीय – समृद्धी परदेशी .
तिसरा 1 ग्रुप मुले प्रथम :- चारुदत्त शिरसाठ , द्वितीय – सात्त्विक पाटील , तृतीय – श्रेयससिंग परदेशी . तिसरा 2 ग्रुप मुले प्रथम – कुणाल शिरसाठ , द्वितीय – पार्थ कुंटे , तृतीय – प्रथमेश पाटील. तिसरा ग्रुप मुली प्रथम – चैताली पाटील, द्वितीय – मानसी चौधरी, तृतीय – स्पर्शज्या नेमाडे
चौथा ग्रुप मुले प्रथम – साहिल तडवी, द्वितीय – स्मित मिश्रा , तृतीय – स्वप्निल पाटील . चौथा ग्रुप मुली प्रथम – प्रियांका साळी, द्वितीय – हंसिका डहाके, तृतीय – मानसी बडगुजर. चौथा ग्रुप मुले प्रथम – चारुदत्त शिरसाठ, द्वितीय – सात्त्विक पाटील, तृतीय – श्रेयससिंग परदेशी.
पाचवा ग्रुप मुले प्रथम – कार्तिक शिरसाठ. पाचवा ग्रुप मुली प्रथम – कोटीज्या नेमाडे, द्वितीय – कांचन कल्याणकर. पाचवा ग्रुप मुले प्रथम – पंकज चौधरी, द्वितीय मयूर शिरसाठ, तृतीय – अनिकेत तायडे . ओपन ग्रुप मुली प्रथम – दीक्षा पाटील, द्वितीय -मिराबाई कोळी, तृतीय – सुजाता रायसिंग, पालक ग्रुप मुले प्रथम – सपना काळे , द्वितीय – मनीषा पाटील.
कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मानव संसाधन विभाग व कराटे व स्केटिंग क्लबचे प्रशिक्षक यांनी केले. सूत्रसंचालन माळी व प्रास्ताविक अश्विनी निकम तर आभार जागृती काळे यांनी मानले. तसेच जळगाव जिल्हा वेटरन इंडियाचे सचिव राहुल वाघ हे देखिल कार्यक्रम च्या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सहाय्यक प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे, सूर्यकांत अहिरे,प्राजक्ता सोनावणे,मनिष चावरे व पोलीस दलातील कर्मचारी देसले,गायकवाड,सोनवणे यांचे सहकार्य लाभले”.