पोलीस उपाधीक्षकावर बलात्काराचा गुन्हा !

मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईत पोलीस उपाधीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. ३१ वर्षीय महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकानेच तक्रार दाखल केली आहे. लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

आरोपीची ज्युनिअर अधिकारी म्हणून तक्रारदार महिला कार्यरत होती. मुंबईत सहाय्यक पोलीस आयुक्तपदावर कार्यरत असताना आरोपीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा महिलेने केला आहे. आरोपी अधिकाऱ्याविरोधात कलम ३७६, ३५४ ड, ३५४ अंतर्गत मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०१९ या काळात हा प्रकार घडल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

आरोपीने आपण विवाहित असल्याची माहिती आपल्यापासून लपवली होती. आपण अविवाहित असल्याचे सांगून त्याने लग्नाचे आमिष दाखवले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा दावा महिलेने केला आहे. लग्नाच्या भूलथापांना फसून त्यावेळी विवाहित असलेल्या तक्रारदार महिलेने पतीपासून घटस्फोट घेतला.

आरोपीने अचानक टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्याने तक्रारदार महिलेने अधिक चौकशी केली, तेव्हा त्याची बनवाबनवी उघडकीस आली. आरोपी पोलीस हा विवाहित असल्याचं पितळ तिच्यासमोर उघडं पडलं. आरोपी पोलीस उपाधीक्षकाला अद्याप अटक झालेली नाही, त्याच्यावर विभागांतर्गत चौकशीही बसवण्यात आलेली नाही

Protected Content