यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गिरडगाव येथील पोलीस पाटील तथा पोलीस पाटील संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांची संघटनेचेच्या जळगाव जिल्हा कार्यध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
शनिवार दि. ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाचा खान्देश विभागीय मेळावा अमळनेर येथील मंगळग्रह मंदीरावर संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील संघाचे राज्यअध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील हे होते तर राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन व जळगाव जिल्हा अध्यक्ष नरेंन्द्र शिंदे हे ही प्रामुख्याने यावेळी उपस्थीत होते. या विभागीय मेळाव्यात प्रामुख्याने दि.१९ डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू होत असलेल्या हिवाळी अधीवेशनावर दि.२२ रोजी पोलिस पाटील संघटनेचा मोर्चो जाणार असुन त्यात पोलीस पाटील यांना सध्या ६५०० मानधन मिळत असून ते १५००० रुपये मिळावे व ३००० रुपये सादील खर्च वेगळा मिळावा तसेच पोलीस पाटील यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षावरून ६५ वर्षे करण्यात यावे. नूतनीकरण कायमचे बंद करावे तसेच मेडिक्लेमही लागू करावा व उच्चशिक्षित पोलीस पाटलांना शासकीय सेवेत १०% आरक्षण मिळावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावेळी विधानभवनावर काढण्यात येणार आहे. यासह पोलीस पाटील यांच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तर पो.पा.संघटनेच्या जिल्हा कार्येअध्यक्षपदी यावल तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष व गिरडगावचे पो.पा.अशोक रघुनाथ पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आपल्या लक्ष वेधणाऱ्या कार्येशैलीने पो.पा.संघटनेचे जे कार्ये अशोक पाटील करीत आहेत त्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली. तर आपल्यावर सोपवलेली संघटनेची कार्यध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी आपण सर्व सहकारी मित्रांना विश्वासात घेऊनच उत्कृष्टपणे पार करू असे यावेळी अशोक पाटील यांनी सांगितले. यावेळी विभागीय मेळाव्यात पो.पा.संघटनेचे धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्हाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व यावल तालुक्यातील नायगाव येथील पो.पा.मनोज देशमुख ,पाडळसाचे पो.पा. सुरेश खैरनार, डोंगरकठोरा पो.पा. राजरत्न आढाळे, बोरावल खुर्दचे पो.पा. गोकुळ पाटील, बोरावल बुद्रूकचे पो.पा. किरण पाटील, भालोद येथील पो.पा. लक्ष्मण लोखंडे, कासवा येथील पो.पा. कैलास बादशहा आदींसह पो.पा.संघटनेचे पदधिकारी उपस्थीत होते.