भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील आंचळगाव येथे पोकरा योजना खरीप हंगाम संदर्भात पुर्व नियोजन सभा घेण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील आंचळगाव येथे आज पोकरा योजनेची खरीप हंगाम २०२३ पुर्व नियोजन सभा घेण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून तंत्रज्ञान समन्वयक प्रदीप बडगुजर यांनी उपस्थितांना शुन्य मशागत तंत्रज्ञान, बीबीएफ तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. कृषी सहायक सुखदेव गिरी यांनी खरीप हंगामाची माहिती दिली. तसेच बीजप्रक्रिया व कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. समुह सहाय्यक श्रीकांत राजपूत यांनी सूत्रसंचालन केले मंडळ कृषी अधिकारी श्री वाघ यांनी आभार मानले. सरपंच यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर ग्राम कृषी संजीवनी समिती व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.