रावेर प्रतिनिधी । कामाचे पैसे मागितल्याने राग येवून दोघांनी एका महिलेला मारहाण केल्याची घटना तालुकयातील विश्राम जिन्सी येथे घडली असून दोघाविरोधात रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील विश्राम जिन्सी येथील रहिवासी महिला ज्योती राठोड या महिलेने १५ रोजी आपल्या कामाचे पैसे मागितले. याचा राग गावातीलच शाम पवार व दयालसिंग पवार यांनी तिला मारहाण केली. यात तिच्या डोक्याला जखम झाली असून ज्योती राठोड यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र राठोड हे करीत आहेत.