पैशाच्या व्यवहारातून महिलेसह मुलीला मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा

crime 2

जळगाव प्रतिनिधी । उसनवारीने घेतलेले पैसे परत करूनही पुन्हा पैश्यांची मागणी करत महिलेसह तीच्या मुलीला मारहाण केल्याप्रकरणी पाच ते सहा जणांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी भावना जवाहरलाल लोढा (वय-३७) रा. अयोध्या नगर ह्या त्यांची मैत्रीण संगिता निरज जोशी रा. आदर्श नगर यांनी अदिल पटेल यांचे डीमार्ट जवळ असलेले घर ४ लाखात ११ महिन्यासाठी ताबेगहाण केले होते. ११ मे २०१९ रोजी झालेल्या या व्यवहारात संगिताकडून फिर्यादी भावना तर पटेल यांच्याकडून बिल्कीस पटेल हे साक्षीदार होते. दरम्यान १ नोव्हेंबर २०१९ रोजी संगिता यांना कौटुंबिक कारणामुळे तातडीने पैश्यांची आवश्यकता असल्याने भावना यांच्याकडे आल्या. यावेळी बिल्किस पटेल यांच्याकडून १ लाख व उर्वरित रक्कम इतर तीन जणांकडून जमवत असे एकुण ४ लाख ५० हजार रूपये संगिता यांना दिले. त्यानंतर टप्प्याने भावना पैसे देत बिल्किस पटेल यांचे एक लाख रूपये परतही केले. मात्र १३ फेब्रुवारी २०२० रोजी पुन्हा पैश्यांची मागणी फिर्यादी भावना यांच्याकडे केली. याला विरोध केल्याने सोबत असलेल्या पाच ते सहा जणांनी बळजबरी घरात घुसून भावना आणि त्यांची मुलगी यांना मारहाण केली. ‘अगर मुझे पैसे नही दिए तो तेरी बेटी आणि तेरे चेहरे पे ॲसिड फेकुंकी और जान से मार दुंगी’ अशी बिल्किस पटेल हिन धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी भावना लोढा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content