जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर सेवा बंद ठेवण्याचे राज्य शासनाने. आदेश दिले आहेत. मात्र,चक्क महापालिकेच्या गांधी मार्केट जवळील पे अँड पार्क सुविधा असलेल्या खुल्या भूखंडावर काहींनी व्यवसाय थाटल्याचे आढळून आल्याने मनपा पथकाने उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मागर्दर्शनाखाली जप्तीची कारवाई केली.
अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकानी आपले व्यवसाय सुरु ठेवल्याचा प्रकार उघड झाला आहे. यातच या व्यावसायिकांनी महापालिकेची गांधी मार्केट शेजारील पे अँड पार्क सुविधा असलेल्या जागेत आपला व्यवसाय थाटला होता. याची माहिती मिळताच मनपा उपायुक्त संतोष वाहुळे हे त्यांच्या पथकासह तेथे दाखल झालेत. यावेळी त्यांनी कारवाई करून गाड्या जप्त केल्यात. ही कारवाई उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना विभागातील पी. पी.पुराणिक, समीर बोरोले, अतुल पाटील,जयंत शिरसाठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमित राजपूत, जितेंद्र चव्हाण आदींच्या पथकाने केली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/968052673964513