पुरवठा निरीक्षकाकडे खंडणी मागणे पडले महागात : पोलिसात गुन्हा दाखल

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जामनेर पुरवठा निरीक्षक यांना दीड लाखाची खंडणी मागणाऱ्या दोघांवर जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रविंद्र आत्माराम पवार याने जामनेर तहसील कार्यलयातील पुरवठा निरीक्षक विठ्ठल मच्छीद्रनाथ काकडे यांना त्याच्याकडे रेशन माल अफरातफर प्रकरणाचा व्हिडिओ असल्याचे सांगून बदनामीचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्यावरून पुरवठा निरीक्षक श्री. काकडे यांनी जामनेर पोलीसात गुन्हा दाखल केला. श्री. काकडे हे जामनेर येथे पुरवठा निरिक्षक या पदावर सुमारे ३ वर्षापासून कार्यरत आहेत. जामनेर तालुक्यातील रेशन दुकान तपासणी, पेट्रोलपंप तपासणी, शासकिय धान्य खरेदि विक्री, गॅस एजन्सी तपासणीचे कामकाज त्यांच्याकडे आहे.
श्री. काकडे यांनी आपल्या तक्रारीत दि. २० मे रोजी शेंदुर्णी ता. जामनेर येथील रविंद्र आत्माराम पवार हे तहसील कार्यालय जामनेर येथे दुपारी ३ वाजेच्या सुमारास आले व तुम्ही रेशनचा माल दुसरीकडे सप्लाय करीत होते अशी माझ्याकडे तुमचे व्हीडीओ चित्रण असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांना सदरचा माल पाठविण्यास मीच सांगितले होता. परंतु, मी नियमाप्रमाणे काम केलेले आहे. त्यानंतर दि. २४ मे रोजी पुन्हा रविंद्र सिताराम पवार व त्याचे सोबत दिपक गायकवाड रा. वाकोद ता.जामनेर (पुर्ण नाव माहीत नाही) हे तहसील कार्यालय जामनेर येथे माझ्याकडे आले व तुमचे व्हीडीओ चित्रीकरण माझ्याकडे आहे तुम्ही काहीतरी सेटलमेन्ट करा नाहीतर तुमचा व्हीडीओ व्हयरल करुन तुमची बदनामी करेल अशी धमकी दिली. त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर मला वांरवार एकट्यात भेटण्यासाठी बोलावु लागला तरी सुध्दा मी दुर्लक्ष केले दि. २७ मे रोजी सकाळी ११ वाजेचे सुमारास तहसील कार्यालय जामनेर येथे रेशन गोडावुनमध्ये सरकारी काम करीत असतांना रविंद्र सिताराम पवार (रा.शेंदुर्णी) व त्याचे सोबत दिपक गायकवाड (पुर्ण नाव माहीत नाही) रा.वाकोद ता.जामनेर यांनी मला फोन करून तहसील कार्यालय जामनेर येथे बोलविल्याने मी तहसील कार्यालय जामनेर येथे आलो असता तहसील कार्यालय गेट समोरील बाकावर वरील दोन्ही व्यक्ती बसलेले होते. तेव्हा त्यांनी मला बोलविले व दमदाटी करु लागले की, तुम्ही मला १ लाख ५० हजार रुपये द्या नाहीतर मी तुमची व्हीडीओ क्लीप व्हायरल करीन व तुमची बदनामी करून तुम्हाला निलंबित करेल. तुमचे प्रमोशन होवु देणार नाही. तेव्हा मी त्यांना सांगितले की कोणतेही चुकिचे काम केलेले नाही मी पैसे देणार नाही. त्यांना माझे वरच्या खिशातील मोबाईल वर संशय आला व मी रेकार्डींग करीत आहे असे वाटले तेव्हा त्यांनी माझा मोबाईल घेवुन चेक केला व तुम्ही माझी रेकार्डींग करीत आहे का ? मी तुम्हाला बघुन घेईल तुम्हाला घरी येवुन मारीन अशी धमकी देवु लागला. त्यानंतर मी सदरचा प्रकार आमचे वरीष्ठ अधिकारी यांचेशी बोलुन पोलीस स्टेशनला तक्रार दिली. माझी रविंद्र सिताराम पवार (रा. शेंदुर्णी )व त्याचे सोबत दिपक गायकवाड (पुर्ण नाव माहीत नाही) रा. वाकोद ता.जामनेर यांचे विरुध्द खंडणी मागीतल्याबाबतच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० कलम ३८४,३८५,१८६,५०४,३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील हे तपास करीत आहे

Protected Content