भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची नियोजीत जागा असून तेथे आजवर पुतळा उभारण्यात आलेला नाही. या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी याच ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करणार आहे.
शहरातील बाजार पेठ पो.स्टे. जवळील जागेवर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. गेल्या काही वर्षापूर्वी याच जागेचे भूमिपूजन ही झालेले आहे मात्र राजकारण्यांची नेहमीची उदासीनता म्हणून कि काय सुमारे पंधरा वर्षांपासून रयतेच्या राज्याचे स्मारक ’ वंचित ’ ठेवल्याचे दिसून येत आहे. यंदा शिव जयंतीच्या मुहूर्तावर वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना घेवून सकाळी दहा वाजता सदर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करणार असल्याचे त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
गेल्याच आठवड्यात विनोद सोनवणे यांनी आपल्या कार्यकर्त्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा ताफा अडवून शिवरायांचा पुतळा उभारला जावा असा आग्रह केला होता. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे, जिल्हा संघटक अरुण तायडे, भुसावळ तालुका सचिव गणेश इंगळे प्रमुख उपस्थिती राहतील तरी सर्व शिवप्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भुसावळ शहर अध्यक्ष गणेश जाधव, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे, भुसावळ शहर उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी केले आहे