पुण्यात निर्बंध शिथिल

 

 

पुणे : वृत्तसंस्था । पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध कायम होते. यावर पुण्यातील व्यापारी महासंघाने नाराजी व्यक्त केली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

 

पुण्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार तर हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात शनिवारी आणि रविवारी सर्व सेवांना दुपारी चारपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉल्सदेखील सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत सुुर ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार आहे. १३ तालुक्यात लेव्हल तीनची नियमावली सोमवारपासून लागू केली आहे. ग्रामीणचा दर ५.५ आहे. पण तिथे लेव्हल ४ ऐवजी ३ ठेवली आहे.

 

हॉटेल चालक आणि दुकानदारांना लशीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक , पुण्यातील सर्व उद्यानं नियमित वेळेनुसार सुरु राहणार , जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी , सात टक्क्यांच्या पुढे पॉझिटिव्हीटी रेट गेल्यास पुन्हा निर्बंध लागणार व “सात टक्केच्या पुढे पॉझिटिव्ह दर गेला तर दिलेली मुभा थांबवली येईल. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंवडकरांनी नियमांचं पालन केलंच पाहिजे. दुकानात विक्री करताना दुकानाचे मालक आणि सेल्समन मास्क वापरत नाही अशी तक्रार आहे.

 

पुण्याकडे अजिबात दुर्लक्ष झालेलं नाही.  रुग्णांचं प्रमाण कमी झालं की निर्बंध शिथिल केले जातील. याबाबतचा निर्णय पुढच्या आठवड्यात घेतला जाईल. नियम तोडून काही लोक काही गोष्टी करतात. वास्तविक माझं सर्वांना आवाहन आहे की, शासन बळजबरीने हे करत नाही. पुण्याकडे दुर्लक्ष असं अजिबात नाही. पुण्याबद्दल कुणी राजकारण करू नये. “, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

 

Protected Content