पुण्यात अवघ्या १२ तासांत १२७ नव्या रुग्णांची भर !

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात अवघ्या १२ तासांत १२७ नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, पुण्यातील एकूण रुग्णसंख्या आता १७२२ वर पोहोचली आहे.

 

बुधवारी रात्री ९ नंतर काही तासांतच ८७ तर मध्यरात्री ४० असे १२७ रुग्ण वाढले. त्यामुळे रुग्णांचा आकडा १७२२वर पोहोचला आहे. यातील बहुतांश रुग्ण झोपडपट्टी भागातील असून संपर्कामुळे त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. पुणे हे करोनाचं हॉटस्पॉट ठरल्याने पुण्यातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. तसेच झोपडपट्टीतील लोकांना शाळा, महाविद्यालयांमध्ये संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.दरम्यान, बुधवारी रात्री सापडलेले १२७ रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेण्यात येत असून या रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

Protected Content