पुणे-बल्लारशा हॉलिडे रेल्वे धरणगावमार्गे धावणार

 

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव प्रवासी मंडळ यांच्या पाठपुरावा केल्याने पुणे-बल्लारशा हॉलिडे रेल्वेगाडी नंदूरबार, धरणगावमार्गे आठवड्यातून एकदा धावणार आहे.

ही गाडी पनवेल, कल्याण, पालघर, वापी, नवसारी, बेस्तान, नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा, चंद्रपूर इथे थांबणार आहे. ३ मार्च ते ३१ मार्च २०२० दरम्यान ही गाडी धावणार असून गाडीला जैन तीर्थ भद्रावती व बळसाना तीर्थासाठी दोंडाईचा इथे थांब्यासाठी प्रयत्न करणार तसेच ही गाडी नियमित होण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे सदस्यांनी यावेळी सांगितले.

झेडआरयूसीसी सदस्य महेंद्र कोठारी, बजरंग अग्रवाल, मोहन खणवानी, बग्गा, वासी मंडळाचे सदस्य रवींद्र भागवत, एस.डब्ल्यू. पाटील, किरण वाणी, किरणसिंग परीहार, डॉ.मिलिंद डहाळे, दिनकर पाटील, हितेश पटेल, सुनील चौधरी, शुशिल कोठारी, दिनेश मेहेर, आनंद बाचपेई, सुधाम चौधरी, बाबा कासार हे सर्व प्रयत्नशील होते.

Protected Content