पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कूलचे मंथन परीक्षेत यश

अमळनेर, प्रतिनिधी   ।  पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मंथन या राष्ट्रीय परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.

 

मंथन पब्लिकेशन संस्था अहमदनगर ह्या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. वर्ष २०१९-२०  ह्या वर्षा करीता उपरोक्त स्पर्धा ही घेण्यात आली होती. शाळेच्या वतीने अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. गौरव धीरजकुमार पवार इयत्ता २ रीतील विद्यार्थ्यांने तालुक्यातून  तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शाळेची व त्याच सोबत जिल्ह्याचा बहुमान वाढविण्याचे कार्य  केले आहे.  याच  सोबत पुष्कर विनोद शिंदे याने स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आणि त्याचा मोठा बंधू इयत्ता ४ थी मधून  प्रतीक विनोद शिंदे याने सुद्धा  यश प्राप्त केले. या तिन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाच्या अनुषंगाने शाळेच्या यशात मनाचा यशाचा तुरा रोवला आहे.  त्यांच्या या गगनभरारी यशाबद्दल शाळेचे चेअरमन प्रदिप अग्रवाल, मुख्याध्यापक  जे.एस.देवरे , पर्यवेक्षिका कु. एम.एस.बारी, सौ. व्ही.एस.अमृतकर, प्रशांत वंजारी, अशोक महाजन, श्रावण पाटील, समस्त शिक्षकवृंद वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वृंद वर्ग यांनी हार्दिक अभिनंदन केले.

 

Protected Content