Home Cities जळगाव पी.जी. महाविद्यालयात स्नेहसंमेलन निमित्त ‘साडी डे’ची धमाल

पी.जी. महाविद्यालयात स्नेहसंमेलन निमित्त ‘साडी डे’ची धमाल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  केसीई सोसायटीच्या पी.जी. महाविद्यालयाच्या ‘रिदम’ या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शुक्रवारी साडी डे साजरा झाला यात विद्यार्थ्यांनी धमाल केली.

 

सकाळपासून महाविद्यालयातील परिसर हा विद्यार्थ्यांच्या उत्साहाने भरला होता. विद्यार्थिनींनी विविध पारंपरिक, पैठणी, नवरंगी, नऊवारी, सहावारी साड्या साड्यांचा पेहराव करून लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी देखील विविध पेहराव केले. शनिवारी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.रविवारी सकाळी १० वाजता स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्राध्यापक के. बी.महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही.एस. झोपे, महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. संदीप पाटील स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. डी. आर. न्हावी रसायनशास्त्र प्रमुख प्रा.आर एम पाटील उपस्थित राहतील. दिवसभरात  नृत्य, नाट्य, गायन साद होतील. संद्याकाळी ४ वाजता के सी ई चे शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते बक्षीस  वितरण होणार आहे.


Protected Content

Play sound