जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । के. सी. ई. सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन मुष्टीयुद्ध स्पर्धा आयोजित करण्यात आली.
यात पुरुष व महिला विभागात वेगवेगळ्या वजनी गटात एकूण १२ महाविद्यालयातील ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातील डी. एन. कॉलेज, फैजपूर यांना तृतीय, कला, वाणिज्य महाविद्यालय, यावल यांना द्वितीय, आणि डी. डी. एन भोळे महाविद्यालय, भुसावळ यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. स्पर्धेचे उदघाटन मु. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे तसेच रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक, विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण प्रसंगी पी. जी. महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ झोपे व एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर उपस्थित होते. सदर स्पर्धेचे यशस्वी आयोजनासाठी निलेश बाविस्कर (महासचिव, जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशन) आणी डॉ. सारंग बारी (क्रीडा समन्वयक, केसीई पी. जी. कॉलेज तसेच महाविद्यालयातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.