Home आरोग्य पीसीपीएनडीटी सल्लागार समिती सदस्यपदी अंजली पाटील यांची निवड

पीसीपीएनडीटी सल्लागार समिती सदस्यपदी अंजली पाटील यांची निवड

0
41

जळगाव, प्रतिनिधी | येथील जिल्हा महिला असोसिएशनच्या सदस्या व दिलासा व्यसनमुक्ती केंद्राच्या सचिव अंजली पाटील यांची जळगाव महानगरपालिकेच्या गर्भधारणा पूर्व आणि जन्म पूर्व निदान प्रतिबंध कायदा(पीसीपीएनडीटी) सल्लागार समिती वर निवड करण्यात आली आहे.

 

अंजली पाटील या गेल्या २५ वर्षापासून व्यसनमुक्ती व महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. महानगरपालिका आयुक्तांनी अंजली पाटील यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा महिला असोसिएशनच्या वासंती दिघे, दिलासा व्यसनमुक्ती केंद्राचे साहेबराव पाटील, सुधीर वसाने यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound