धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील शेतकऱ्याने वेळोवेळी घेतलेले पीक कर्ज व त्याचा परतावा व्याजासकट केलेले असताना नव्याने पीक कर्ज देण्यास बँकेच्या व्यवस्थापकाने नकार दिला असून कर्जदाराला धमकवण्याचा प्रकार समोर आला आहे. न्याय मिळवून पीक कर्ज देण्यात यावे या मागणी शेतकऱ्यांनी युनियन बँकेच्या समोर अमर उपोषणाला सुरुवात केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश रामलाल पूरभे रा. बाजोट गल्ली, धरणगाव हा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीची नावे शेती आहे. त्यांनी पीक कर्ज घेतले असून कर्जाची नियमित पर परतफेड करत आहे. परंतु गेल्या कोरोना महामारीच्या काळात त्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे योगेश पुरभे यांनी पीक कर्जची परतफेड करू शकले नाही, दरम्यान जशी जशी त्यांची परिस्थिती बरी झाली त्यानी २ फेब्रुवारी २०२२ रोजी पूर्ण थकबाकी व्याजासह परतफेड करून दिले. त्यावेळी बँक व्यवस्थापक भूषण मोरे यांनी नवीन पीक कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान तेव्हापासून ते आतापर्यंत बँक व्यवस्थापक भूषण मोरे यांनी नवीन पीक कर्ज देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. तसेच त्यांच्याकडे पुन्हा पीक कर्ज देण्याची विनंती केली असता बँक व्यवस्थापक मोरे यांनी शिवीगाळ करून दमदाटी दिली आहे. याला कंटाळून शेतकरी योगेश पुरभे यांनी धरणगाव शाखा युनियन बँकेच्या समोर आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणात योगेश पूरभे, विनोद बयस, जगदीश परदेशी, निलेश बयस, विनोद बयस, सुरेश बयस, परेशसिंग बयस, हर्षल बयस, कीर्ती शिकारवर, मोहनसिंग जानकवार, विशाल जानकवार यांच्यासह राजपूत युवा मंडळ यांनी सहभाग घेऊन पाठिंबा दिला आहे.