पीकविमा मुदतवाढीसाठी ठाकरे सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज  मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी असा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्राकडे पाठविल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

 

पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची १५ जुलै शेवटची मुदत असून आतापर्यंत ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, असं कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २३ जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव आज राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे.

 

शेतकऱ्यांना वेबसाईट संदर्भातल्या समस्यांसह अनेक तांत्रिक अडचणींनाही सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे पीकविम्याला मुदतवाढ द्यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. शेतकऱ्यांची विमा भरण्याची इच्छा असूनही पोर्टल बंद पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरण्यात अडचणी येत आहेत.

 

Protected Content