पीएम किसान योजनेचे फैजपुरातील शेतकऱ्यांचे अनुदान बंद

फैजपुर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच अनुदान फैजपूर शहरातील जवळपास  ९५ % शेतकऱ्यांचे अनुदान बंद झाल्याचे दिसून येत आहे. यातील त्रुटी दूर करण्याबाबतची मागणीचे  निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

 

 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच अनुदानसंदर्भात तहसीलदारांना सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौधरी यांनी निवेदनाद्वारे शासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली व या योजनेत असलेल्या त्रुटी संदर्भात सुद्धा शासनाने त्वरित लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांची होणारे हेडसांड थांबवावी असे सुद्धा निवेदनात नमूद केलेले आहे. यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर चेक केले असता त्यांच्या नावासमोर लँड सेटिंग नो म्हणजेच शेतजमीन नसल्याचा शेरा दिसत आहे .परंतु, याच शेतकऱ्यांना आजतागायत शासनाकडून जवळपास दहा हप्ते पीएम किसान सन्मान निधीचे आलेले आहे. आताच या या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन नाही असे शेरे कोणी व कसे मारले ? कोणत्या एजन्सी मार्फत नमूद केले याबाबत चौकशी व्हावी. त्यात सोबत एकूण पाच त्रुटी या निवेदनाद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. त्यात तालुकास्तरावर नेमणूक केलेले लिपिक बाविस्कर वारंवार आलेल्या शेतकऱ्यांना साईड स्लो चालते अथवा चालत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे त्यांचे म्हणणे एकूण न  घेता त्यांना फक्त आश्वस्त करून परत पाठवतात व त्यांना खेटे  मारायला लावतात. त्यासोबत नवीन शेतकऱ्यांनी ज्यांना अनुदान मिळत नाही अशा शेतकऱ्यांनी अनुदान मिळण्यासाठी नवीन प्रस्ताव सादर केलेले आहे. परंतु, ते सुद्धा जवळपास वर्षभरापासून सहा महिन्यापासून प्रलंबित आहे. त्याच सोबत काही लाभार्थ्यांच्या अनुदान किरकोळ कारणामुळे बंद झालेले आहे. उदाहरणार्थ नावात चूक असणे, आधार पॅन कार्ड व मोबाईल नंबर लिंक नसणे किंवा इतर छोट्या मोठ्या त्रुटी की ज्याचे शासन दरबारी पूर्तता करून सुद्धा अशा लोकांना किमान एक वर्ष सहा महिन्यापासून शासन दरबारी का खेटे मारावे लागत आहे. याची सुद्धा स्पष्टीकरण शासनाकडून व्हावे.त्यासोबत सदरची योजना कार्यान्वित झाली तेव्हा ग्राम स्तरावर तलाठी कार्यालयाला या शेतकरी बांधवांचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे. अशा शेतकऱ्यांच्या अनुदान अजून मिळत नाही तर नंतर संगणकीय प्रणालीमध्ये सेतू केंद्रामार्फत सादर केलेल्या प्रस्तावानुसार पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळत आहे तर तलाठी यांनी सादर केलेल्या प्रस्तावित शेतकरी खातेदार यांना अनुदान बंद झाले. हा सर्व ऑनलाईन प्रणालीचा घोळ असल्यामुळे यात  शासनाने त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपयांचे वार्षिक येत असलेल्या अनुदान तात्काळ सुरू करावे व नवीन नवीन लाभार्थ्यांना अनुदान सुद्धा तात्काळ सुरू करावे व शासन दरबारी शेतकऱ्यांची न घेतली जाणारी दाखल या सर्व बाबीत तहसीलदार यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांची होणारी हेडसाण थांबवावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.  या निवेदनाच्या प्रति पालकमंत्री,   जिल्हाधिकारी, आमदार शिरीष चौधरी यांना देण्यात आलेल्या आहे.  यासंदर्भात शासनाकडून त्वरित दखल न घेतली गेल्यास या सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा येथील पप्पू चौधरी निवेदनाद्वारे यांनी दिलेला आहे.

Protected Content