पिळोदा खुर्द येथे कोवीड लसीकरण शिबिरास ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद

यावल, प्रतिनीधी । तालुक्यातील  पिळोदे खुर्द व परिसरातील नागरीकांसाठी कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण पातळीवर ग्रामस्थांसाठी कोविड १९ लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. सदर लसीकारणासाठी गावातील  ४५ वर्षाच्या वरील नागरिकांनी आपले लसीकरण करून घेतले.

पिळोदे खुर्द व परिसरातील नागरीकांसाठी यावल तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांच्या  मार्गदर्शनाखाली  लसीकरण शिबीर घेण्यात आले. यात डॉ. मनिषा महाजन यांच्या नेतृत्वाखाली साकळी येथील डॉ. सागर पाटील व डॉ. स्वाती कवडीवाले त्याच प्रमाणे साकळी  प्राथमिक आरोग्य केंद्र  येथील आरोग्य सेवक एम.पी. निकुंभ ,आरोग्य सेविका श्रीमती एस.बी. कोळी, आशासेविका आनिता पाटील यांनी लसीकरणाच्या शिबीरास यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. थोरगव्हण आरोग्य उपकेद्रातील  येथील सी. एच. ओ. डॉ. सैय्यद गझाला नदीम अख्तर यांनी लसीकरणानंतर आपण कुठल्याही अफवांवर विश्ववास न ठेवता लस घेतल्यावर कोणती व काय काळजी घ्यावी याबाबतची सविस्तर अधिक माहिती या वेळी लस घेणाऱ्या नागरीकांना दिली.येथील गावकरी मंडळी यांनी कोवीड १९ च्या लसीकरण शिबीराला चांगला प्रतिसाद दिला.

 

Protected Content