चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिलखोड येथे कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत भांडण सोडवायला गेलेल्या एकाचा खून झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पिलखोड येथे काका व पुतण्यात कौटुंबिक वादातून भांडण सुरू होते. काका- पुतण्याचे भांडण सोडविण्यासाठी गेलेले गावातील व्यक्ती धोंडू सुपडु पाटील (वय-६२) हे गेले असता त्यांना हाणामारीत डोक्याला जबर मार लागून खून झाला आहे तर सचिन धोंडू पाटील (वय-२८) हा गंभीर जखमी झाला. जखमीस तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
सविस्तर वृत्त लवकरच