जळगाव प्रतिनिधी । शेतीचा उतारा देण्याच्या मोबदल्यात शासकीय फीच्या व्यतिरीक्त २४० रूपयांची लाच मागणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील तलाठ्याने एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार पिलखोड येथील तलाठी प्रशांत ज्ञानोबा कनकुरे (वय-३२) रा.चाळीसगाव याने आज दुपारच्या वेळेस शेतीच्या उतारा देण्याच्या कामी शासकीय फीच्या व्यक्तीरीक्त २४० रूपयांची अतिरिक्त पैसे (लाच) मागितले. एसीबीचे अधिक्षक गोपाळ ठाकूर, पो.नि.निलेश लोधी, संजोग बच्छाव, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.मनोज जोशी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांना सपळा रचून तलाठी कनकुरे यास ताब्यात घेतले. पुढील तपास पो.नि. निलेश लोधी करीत आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.