एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तळई येथे १३ सप्टेंबर रोजी मेघ गर्जनेसह वादळी पाऊस झाल्याने खरीप शेती पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले त्यात कापूस सोयाबीन मका व इतर पिकांच्या समावेश आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी तळई ग्रामपंचायतचे सरपंच भाईदास मोरे व ग्रामस्थ यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
निवेदनावर सरपंच मोरे, विठ्ठल पाटील, रतन पाटील, राजेंद्र पाटील, निलेश पाटील, प्रभाकर पाटील, शांताराम पाटील, विजय पोतदार, सोपान पाटील, तानाजी भिल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वादळी पावसामुळे शेती उत्पादनाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.